वादे कितीक मेले लोक

वादे कितीक मेले लोक । नको करू त्यांचा शोक ॥
ज्ञानी - पंडित बुडाले । लटाधारी भले-भले ॥
नामस्मरण - पंथ धरा । करा विठ्ठल सोयरा ॥
तुकड्यादास म्हणे वाद । करवी काळापुढे खेद ॥