अरे ! जेथे काही ही न दिसे ते पाही

अरे ! जेथे काही न दिसे ते पाही । अलक्षत्वे राही ब्रह्म सदा ।।
तेथे वादावाद खुंटला सर्वही । अद्वत ते पाही रूप साचे ।।
नैति-नेति ते ही बोलताती वेद । अज्ञानी तो स्वाद काय ओढी ?
म्हणे तुकड्यादास गुरुकृपे खास । लाभे ब्रह्मरस सहजचि ॥