वादावाद सदा करिती ते

वादावाद सदा करिती ते ‍द्नानी । अनुभव कोणी कैसा बोले ? ।।
पाहोनी ते सुख लु्ब्धले शरीर । सर्व नारी नर हरी दिसे ।।
कैसा हो कोणासी करील उपदेश ? । लक्ष्य बह्मरस झाले त्यांचे ।
म्हणे तुकड्यादास होई रे ! उदास । लीनता ते खास अनुभवी ।।