गाढवा रे ! सांगू किती ?
अहंकारी ज्ञान
गाढवा रे ! सांगू किती ? । केली आयुष्याची माती ।।
घाली विहिरीत ते ज्ञान । असे अनुभवावीण ॥
व्यर्थ बरळसी पिसाट्या ! । उरी उभा असे माट्या ।।
तुकड्या म्हणे हे थोतांड । टाकी टाकी रे ! ते बंड ।।