तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
जरी झाल्या भाषा अनंतही पाठ
जरी झाल्या भाषा अनंतही पाठ । प्रेमाचा बोभाट हृदयी नाही ॥
बहुत करिती श्वानांची परीक्षा । परी अपरोक्षा ठाव नाही ॥
फारचि शिकले बी.ए.पास झाले । विषयांनी नेले आयुष्य ते ॥
ऐसे जे गाढव असतील जगी । तुकड्यादास वेगी
दूर त्यांच्या ॥