अनुभवालागी नको ब्रह्मज्ञान
अनुभवालागी नको ब्रह्मज्ञान । शास्त्रादि पठन नसे जरी ॥
रामकृष्णहरि उच्चारिता मुखी । राहशील सुखी ब्रह्मानंदी ॥
सर्व हे शरीर दिसे तुज शास्त्र । अपवित्र पात्र नाही कोठे ॥
म्हणे तुकड्यादास गुरुशरण जाई । राही त्याचे पायी भावबळे ॥