आंधळे पांगळे तेही नाम घेती

आंधळे पांगळे तेही नाम घेती । का न उद्धरती संतावाणी ॥
घोष रात्रंदिनी करिती नामाचा । का न संत साचा म्हणे कोणी ? ॥
कळवळ्यावाचोनी व्यर्थ ब्रह्मज्ञान । अनुभवावाचोन मोक्ष नाही ।।
दास तुकड्या म्हणे गुरुकृपे ज्ञान । अपरोक्ष ते जाण सत्य बापा ! ॥