शरीरी सामर्थ्य आलियावाचून
शरीरी सामर्थ्य आलियावाचून । व्यर्थ ब्रह्मज्ञान सांगू नये ।।
करोनिया पाठ परोक्ष ते ज्ञान । उपदेश-कीर्तन करिती फार ॥
जरी कर्मकांड केले नाही त्याने । तरी आत्मज्ञाने निवलो म्हणे ॥
असोनिया सान सांगे शहाणपण । पोथी वा पुराण दावी त्वरे ॥
म्हणे तुकड्यादास कलीच्या आचारे । काळ वास करे जवळचि ॥