कुठवरी आता गाऊ भजन हे

(चालः यहाँ वहाँ क्या कहाँभि...)
कुठवरी आता गाऊ भजन हे ।
का आवरि ना अजुनी मन हे ? ॥धृ0॥
कळते पण वळते नच काही ।
धावचि घेते विषय - प्रवाही ।
सांगा गुरुराया ! या साठी - काय करावे किती साधन हे ! ॥१॥
भलेपणाने पापहि करते I
पापी म्हणण्या मागे फिरते I
खाया - प्याया पुढे - पुढे पण - सेवेसाठी करी हन् - हन् हे ! ॥२॥
हे द्या ते द्या सर्वची मागे I
मोह अनावर फिरूनी सांगे I
तुकड्यादासा मृत्यु बरा परि - सहन न होई मज प्रभुविण हे  ॥३॥
                           - जानेवारी १९६४