कौतुक किती ऐकवावे देवाचे
( चाल : हाच ! किसीकी याद में हम ... )
कौतुक किती ऐकवावे देवाचे I
कोण किती मिळतील या दैवाचे ! ॥धृ0॥
मज पाहिजे मनात स्थिर मानव जे I
जे पाहताची पळतिल हो दानव ते ।
सार तेची घेतील या भक्तीचे ॥१॥
जे भक्तिभाव धरुनी प्रभु जपताती ।
ते आवडती देवासी निज हाती ।
सोडिना तयास प्रभू हदयाचे ॥२॥
तो प्रिय भक्त समजोनी धावत ये ।
निघताची वाक्य भक्ताचे खांबी निघे ॥
हरी संकटास वस्त्र पुरवी द्रौपदीचे ॥३॥
ऐक मानवा ! सुमार्ग भक्तीचा I
चुकवोनी फेर घेई पाठ मुक्तीचा ॥
तुकड्याचे बोल भक्ति - भावाचे ॥४॥