जग स्वप्नासम जानी

जग स्वप्नासम जाणी । दुःख तेथे काय मानी ? ॥
माया असे   अनिवार । दावितसे रे! डंबर ।।
ब्रह्म आकाशी कोंदले । रीघ नसे, पार गेले ॥
शून्य होती लोक  चार । तेव्हा ब्रह्म दिसे थोर ।।
तुकड्या म्हणे सांगो किती ? । केली कर्तव्याची माती ॥