चित्तशुद्धीसाठी करावे ते कर्म

चित्तशुद्धीसाठी करावे ते कर्म । तेथे काम नेम जाणू नये ॥
सदगुरु ते कोणा न करिती कृपा । जेवि पुण्यपापा जन्म मिळे ।।
शुद्ध ज्याचा भाव असे चरणावरी । तोचि अधिकारी मोक्षाचा हो ! ॥
तुकड्यादास म्हणे नम्रता ठेवणे । तेचि ते शहाणे सत्य घेती ॥