कर्म ते करावे चित्तशुद्धीसाठी
कर्म ते करावे चित्तशुद्धीसाठी । भक्तिने गोमटी वाट लागे ।।
जरी ब्रह्मज्ञान झाले शब्दे नरा । न चुके तो फेरा चौऱ्यांशीचा ॥
जप - तप - नेम केले फार जरी । वासनेची फेरी तुटे केवी ? ।।
म्हणे तुकड्यादास सद्गुरुवाचोन । बोलताति जन शुक जैसे ।।