ठेविला जोहरी हृदयात ज्याने
ठेविला जोहरी हृदयात ज्याने । तोचि आत्मज्ञाने गुरु झाला ।।
जोवरी साधका द्वैत बुद्धी राहे । गुरु-शिष्य पाहे तोवरीच ॥
अद्वैत ती वृत्ती गुरु-शिष्य एक । मी तू पण शोक नाही जेथे ॥
कर्म न सोडावे तुटलीयाविना । हो का तो शहाणा तुकड्या म्हणे ॥