जेथे अंत नाही काही

जेथे अंत नाही काही । तेथे जाशी कैसा पाही ? ॥
गेले पुन्हा न येती बापा ! । लागल्या त्या बहू झोपा ॥
जातो म्हणती ऐसे जन । परी न वळे त्याचे मन ।।
तुकड्यादास म्हणे जाई । गुरुकृपा आधी घेई ॥