अनुभव तुज येणे आहे गड्या !
अनुभव तुज येणे आहे गड्या ! । सांगतो मी थोड्या उपायासी ॥
न करी साधन कधी धूम्रपान । भ्रमस्थिती जाण लाभे तेणे ।
सोडसी तू वेळ अज्ञानमतीने । संधी कृपादाने साधिजे ती ॥
म्हणे तुकड्यादास सुषुप्तीचे स्थान । हृदयी प्रमाण पाही पाही ।।