उघडी पडळ पाही रे ! अदृश्य

उघडी पडळ पाही रे ! अदृश्य । झोप सावकाश लागे कैसी ? ।
पंचतत्त्वा आत साठविले तेज । तयाते सहज पाही वरी ॥
रूप नाही ज्यासी नाम तेही नाही । अद्वैत लवलाही होशील रे ! ।।
तुकड्यादास म्हणे संतसंगाविण । त्वंपद हे जाण कळे सत्य ।