ज्याशी आत्मसाक्षात्कार नाही झाला

ज्यासी आत्मसाक्षात्कार नाही झाला । अज्ञानी बुडाला नर तोचि ॥
प्रेमभक्ती ज्याचे नाही आली हाता । तोवरी तो ज्ञाता झाला नाही ।।
काम क्रोध मोह जिकितो बा ! ज्यासी । अज्ञानी रे ! तोचि जाण रया ।।
त्वंपद - तत्पद विचार जो पाहे । तोचि ज्ञानी होय तुकड्या म्हणे ॥