सांगे जो भविष्य - भूत - वर्तमान
सांगे जो भविष्य-भूत-वर्तमान । त्यासी म्हणे ज्ञान ऐसे नव्हे ॥
जरी जाणे दुज्या जिवाची ते स्थिती । त्यासी ज्ञानमती म्हणो नये ।।
करुनी साधन बहुत सांगती । गारुडी बोलती, तैशापरी ॥
तुकड्यादास म्हणे खरे ज्ञान पाही । मी कोण गलवलाही शोध गड्या ! ॥