योग याग जप क्रिया नेम तप
योगयाग जप क्रिया नेम तप । अवघा खटाटोप दंभधर्म ।।
सद्गुरुवाचूनि व्यर्थ ब्रह्मज्ञान । गीताशास्त्र पठन दंभधर्म ।
भावेविण वश नव्हेरे ! तत्त्वता । प्रवीण सर्व कळता दंभधर्म ॥
भूतभविष्य सांगे आणिक वर्तमान । सद्गुरुवाचून दंभधर्म ।।
कीर्तन आणिक करिती उपदेश । संन्याशाचा वेष दंभधर्म ।।
ब्रह्म एक आहे, अनुभव पाहे । गोष्टी बहुत लाहे दंभधर्म ।।
श्वासी ठेवोनिया अवघेचि मन । धरी गुरुचरण तुकड्या म्हणे ॥