गुण - दोष सर्व करी कृष्णार्पण

गुण-दोष सर्व करी कृष्णार्पण । मग होई वहाण सद्गुरुची ॥
सांगतो हो गुज, तुचि बह्य आहे । बुडालासे पाहे अहंकारे ॥
मी-तू पण जव लागले जयाला । तोवरी तो भ्याला कळिकाळा ॥
तुकड्यादास म्हणे एकाचे अनंत । पुढेही त्वरित एक होती ॥