संतांचे संगती आत्मज्ञान होई

संतांचे संगती आत्मज्ञान होई । जाई लवलाही संतसंगे ॥
जगताचे ढीग सर्वही अद्वेत । पाहता त्वरीत राम भेटे ॥
संत-चरण-लाभ घडे ज्या नरासी । रूप अविनाशी दिसे त्याला ॥
म्हणे तुकड्यादास विदेही ती स्थिती । सहज ये हाती संत-बोधे ॥