आम्ही तो फकीर, नाही मानपान
आमची ब्रह्मरूपता
आम्ही तो फकीर, नाही मानपान । खोटे ब्रह्मज्ञान दिसे मज ॥
काळवेळ नको भक्ती ती कराया। खरा मार्ग राया! हाचि असे॥
तुरिया-उन्मनी काय रे ! करिसी ? । आधी संशयासी न फेडिले ॥
तुकड्यादास म्हणे काय मान-धन ? । त्यागावया प्राण जगी येती ॥