झालो मी अधर्मी सोडीलासे धर्म

झालो मी अधर्मी सोडिलासे धर्म । तव - व्रत - नेम गुंडाळल l
नाही मज जात, झालो मी अजात । मायेचाही पंथ दुरी ठेला।।
माझे-माझे करी ऐसा जो हा नर । मी कोण सुंदर ओळखावा॥
मजे तुकड्यादास अंतर निर्मळ । तो एक केवळ ब्रह्मरूप ॥