अनंत जन्माचा शेवट

                       अजपा व योगगुंफा
अनंत जन्माचा शेवट । नरदेह हा  अवचट ॥
निघे  अमृताचा झरा । सोह नामी येरझारा ।।
इडा -पिंगला ती नदी । संगम होतो त्रिकुटामधी ॥
राही अजपामध्ये लीन । तुकड्या म्हणे होशिल धन्य ॥