त्रिकुटी संगमी वेळ झाला माय
त्रिकुटी संगमी मेळ झाला माय । सत्रावी ते गाय दूध देई ॥
चार नारी गेही भोगूनिया येई । मग राम पाही त्वरीत तो ॥
सत्रावीवर शून्य शून्याचा शेवट । नील बिंदू नीट दिसतसे ॥
मयुरपंख डोळे खूण हेचि सांगे । प्रमाण अंगुष्ट गे ! तुकड्या म्हणे ॥