कलियुगामाजी मंडीला अंधार
कलीयुगातील अंधेर
कलियुगामाजी मांडिला अंधार । वेश्यांचा व्यापार फार चाले॥
असोनी श्रीमंत धनधान्य घरी । बापालागी मारी पोरटा तो ॥
बाईल ती केली मालकीण धनी । भरे घरी पाणी तियेसाठी ॥
म्हणे तुकड्यादास लिहिले जे संते । न चुके मत ते सत्य जाण ॥