काय सांगू घोर महिमा कलीचा ?

काय सांगू घोर महिमा कलीचा?। छळ ब्राह्मणांचा फार होतो॥
सोडोनी क्षत्रीय शिकार ती जाण। घेती दीन प्राण अजाचा हो॥
भजन व्यवसाय पार ते सुटले । करिती लोक भले दंढारी त्या॥
म्हणे तुकड्यादास घुमारे ते खास । दाविती जनास भूतबाधा॥