जग हे आंधळे कळले मजसी

जग हे आंधळे, कळले मजसी । दुष्ट या मनासी साथी घेती ॥
घातलेसे पुढे नयनाचे पडळ । कैसा जाय काळ पळोनिया ? ॥
साधुसंतांची ती बहू होत निंदा । दुष्टाची मर्यादा राखताती ॥
तुकड्यादास म्हणे नित्यानित्य कांही । जो नर न पाही अंध तोची ॥