कलीमाजी नाही जाती कुळधर्म
कलीमाजी नाही जाती कुळधर्म । सत्यपण नेम क्वचितचि ॥
पोटासाठी साधू झाले भराभर । पुढे झराझर यम ओढी ॥
यमाचा हंगाम सुरू झाला फार । बंडाचा बाजार झाला म्हणे ॥
ब्राह्मणांचे शूद्र शद्रांचे ब्राह्मण । करी संध्यास्नान महार तो ॥
तुकड्या म्हणे काही बोलवेना वाचे । दंढारी-तमाशे फार झाले ॥