झालासे अधर्म कलीमध्ये फार
झालासे अधर्म कलीमध्ये फार । जातीचा आचार दुरी ठेला ॥
ब्राम्हण तो म्हणे काय स्नानसंध्या ? । आणावा उपाध्या एके दिनी ।।
खाती मद्यमांस सोडोनिया नेम । शालीघ्राम - प्रेम सांडोनिया॥
तुकड्यादास म्हणे सागितले संते । सर्व त्यांची मते सत्य झाली ।।