सोडीला रे ! धर्म भ्रष्ट फार झाले
सोडिला रे ! धर्म भ्रष्ट फार झाले । उदरी का न मेले मातेच्या हो ? ॥
असूनिया श्रेष्ठ नीच ते वर्तन । सोडा सोडा प्राण धरणीवरी ॥
निर्लज्ज हे झाले लालुचीच्या योगे । पैशासाठी वेगे धरिती पाय ।
तुकड्यादास म्हणे धरूनी उमज । साधा साधा गुज आता तरी ॥