कासया निर्माण केले तुम्हा देवे ?

कासया निर्माण केले तुम्हा देवे ? । रत्नासी गाढवे धुळी नेले ॥
करावा हो ! बोध सकळासी तुम्ही । लागलेत कामी वेश्येसंगे ॥
मांडिलासे फार   अंधेर   जगात । ते संतमहंत म्हणो केवि ? ॥
तुकड्यादास म्हणे सांगितले संते । तेचि सर्व सत्य होत असे ॥