विडा खाई गा श्रीहरी !

विडा खाई गा श्रीहरी ! । मनोभावे अर्पण करी ॥
घेवोनिया    करी   पान । चुना लावितो  वरून ॥
जायफळ - दोडे - कात । लवंग- सुपारी टाकीत ॥
विडा घेई प्रेमे करी । म्हणे तुकड्या हो श्रीहरी ! ॥