अनाहतचक्री नाद तो घुमत
काव्य पुष्पांजली
अनाहदचक्री नाद तो घुमत । अनुभवा येत तैसे आता ॥
कर्णासी कर्कश नेत्रासी वाईट । मनासी दुप्पट दुःख झाले ॥
गृही माझे यंत्र बहू जोरी आले । जठराम्नी पातले जवळ त्याचे ॥
म्हणे तुकड्यादास जे वेळी एकप्र । ते वेळी समग्र अभंग करा।