गुरुदेवाच्या पूर्ण कृपेने कार्यासी लागलो

( चाल : रक्ष रक्ष ईश्वरा भारता . . ) 
गुरुदेवाच्या पूर्ण कृपेने कार्यासी लागलो । 
काय उचित कर्तव्य आपुले , जाणाया लागलो ॥ धृ ।।
मनुष्य प्राणी काय कराया देवाने निर्मिला । 
सकल सृष्टि ही एकचि  रूपी खूण न पाहता भुला ॥ १ ।। 
सर्व आपुले अथवा परके मनुष्यमात्रादिकी । 
एकवटोनी रहावे  सकळी,   ज्ञान   हेच    कौतुकी ।। २ ।। 
भ्रामक ही कल्पना आपुली ,  मी दुःखी तू सुखी  । 
आसक्तीचा रोग  जयाला   दोन्हि   तया   सारिखी ।। ३ ।। 
अती वयं - ही चाल सुखाची  संतांनी गायिली  । 
शोधुनि पाहता मर्म   तयाचे   अनुभविया   पावली ।। ४ ।। 
सगळा हा अध्यात्म दावितो  प्रभुची रूपे तुम्ही  । 
तुकड्यादास म्हणे शोधाया भक्ती  धरिली   अम्ही ।। ५ ।। 
- जीवन जागृती१९४८