गडे हो कृष्ण गडी अपुला
( चाल : सुजन हो परिसा . . )
गडे हो कृष्ण गडी अपुला , राजा मथुरेचा झाला ।। धृ० ।।
कांबळ खांदी हाती काठी , वाजवी पावा धरुनी ओठी ।
कसा अता विसरला । । राजा ॥ १ ॥
चोरीत होता दही दुध लोणी , फोडीत होता मडकी धरोनी ।
कसा अता विसरला । । राजा ॥ २ ॥
यमुने काठी खेळीत होता , गाई गोपिका जमवीत होता ।
कसा अता विसरला । । राजा ॥ ३ ॥
पीतांबर सुंदर जरतारी , मयुर पिसारा शीरि मनहारी ।
कसा अता विसरला | | राजा० ॥ ४ ॥
तुकड्यादास म्हणे हा भुलला , सोडुनि आम्हा मोठा झाला ।
चला धरू रे त्याला । । राजा0 ।। ५ ।।
- जीवन जागृती १९४८ ९९९ भजन