सहनशील व्हावे आपुलीये अंगी
सहनशील व्हावे आपुलिये अंगी । उदंड प्रसंगी क्षोभू नये ।
दुजियासी तरी राग न ये कदा । व्यवहार सर्वदा शांत चाले l
न्यायाने वागावे प्रेमळ बोलावे । कार्य नीट व्हावे सर्वकाळ ॥
तुकड्यादास म्हणे ही युक्ति थोरांची । ना अन्य चोरासी गळी पडे ॥