आलो कशासाठी काय लाविले पाठी ?

               अनुताप व प्रार्थना
आलो कशासाठी काय लाविले पाठी ?
केला     उठाउठी    घरदार    पसारा ॥
वासना ही रांड सदा तोडी जीवासी ।
करता हाजी हाजी दिवस राजी मानावे ॥
मानाजीच्या मार्गे देह झाला वावरा ।
सदा येरझारा करी पोटाच्या साठी ॥
देवा! तुझे नाम जन्मताचि निमाले ।
आले तैसे गेले गर्भवास भोगाया ॥
तुकड्यादास म्हणे एका नामाच्या विना ।
वाजवी भनाना सर्व गेली कमाई ॥