चिंतेच्या बाजारी खरीदला बाजार

चिंतेच्या बाजारी खरीदला बाजार ।
सर्व येरझार व्यर्थ झालिये माझी ॥
वासना ओढाळ म्हणे जाहो बाजारी ।
फुका धालो भरी स्वप्नाचिये माझारी ॥
स्वप्नाचिये लाख मागे जागृतिये भीक।
व्यर्थ जाय शोक कर्मावीण त्यापरी ॥
नाही दिले देवी जरी राज्य लाभावे ।
आणूनिया देवे काय कोठूनी द्यावे ? ॥
तुकड्यादास म्हणे कर्म करा चोखटे ।
मग सर्व फिटे भ्रांति - बंधने सारी ॥