अनंत जन्माचे सुकृत I

अनंत जन्माचे सुकृत । आजी फळले अकस्मात ॥
झाला लाभाचाहि लाभ । दृष्टी पडला पद्मनाभ ॥
ज्याचे कटावरी कर I गळा तुळसीचे हार ॥
तुकड्या  म्हणे सगुणमूर्ति । देई जीवासी विश्रांति ॥