तया पाहता नयनी I

तया पाहता नयनी । सुख झाले माझ्या मनी ॥
गळा तुळसीचे हार । उभा विटे कटी कर ॥
कानी कुंडले मकराकार । ध्यान साजिरे सुकुमार ॥
तुकड्या म्हणे हरपे भ्रांती । त्याचे रूपी मिळे शांति ॥