राजा भेटावा सैनिका I

राजा भेटावा सैनिका । देव भेटावा भाविका ॥
मेघ भेटावा चातका । आई भेटावी बालका ॥
द्रव्य भेटावे हे रंका । मित्र रंजल्यासी निका ॥
तुकड्या म्हणे होय सुख । तैसे विद्ठलाचे मुख ॥