तया पाहता सामोरी I

तया पाहता सामोरी । चित्त डोलते अंतरी ॥
सखा विठ्ठल सावळा । सर्व सुखाचा पुतळा ॥
उभा राहे विठेवरी । कार्य त्रिभुवनीचे करी ॥
तुकड्यादास म्हणे जन्म घ्यावे | अखंड तयासी पहावे ॥