गळा भुजंगाचे हार I

गळा भुजंगाचे हार । अंगी शोभे व्याघ्रांबर ||
जटाजूट शंभु राजा । तया नमस्कार माझा ॥
भस्म लेपले सर्वांगी । सदा योगासनी रंगी  ॥
तुकड्या म्हणे एकांतवासी । रमे शंभु ज्ञानराशी ॥