रम्य प्रशांतशा स्थानी I

रम्य प्रशांतशा स्थानी । शंभु बैसे सदा ध्यानी ॥
करी नामाचा उच्चार । राम नामी शांति फार ॥
योगियांचा मुकुटमणि । गिरिजापति विश्वधनी  ॥
तुकड्या म्हणे ध्यानी धरा । भोळ्या प्रिय या शंकरा ॥