जीवा न वाटे उठावे I

जीवा न वाटे उठावे । स्थान पाहोनी बरवे ॥
सदा एकांताचा वास । रंग चढतो ध्यानास ॥
शांति प्रशांतीचे स्थळ । गिरी कंदरी देऊळ ॥
तुकड्या म्हणे गुप्त लिंग । ध्याता रंगे अंतरंग ॥