हर हर शब्दांचा गजर I

हर हर  शब्दांचा गजर । करिती भोळे भाविक नर ॥
डोले शंभु तया नादे । सदा राही तो आनंदे ॥
नेत्री लागली समाधि । तार न तुटे हा कधी ॥
तुकड्या म्हणे प्रेम लावा । नेत्री शंकर पहावा ॥