गरूड आकाशी झळकला |

गरूड आकाशी झळकला । वाटे माझा स्वामी आला ॥
आला भक्तांचा कैवारी । देतो दर्शन मुरारी ॥
हाती चक्र सुदर्शन । कोटी प्रकाशे किरण  ॥
तुकड्या  म्हणे गमला ध्यानी । शीर ठेविले चरणी ॥