आम्ही जाहलो नि: संग I

आम्ही जाहलो निःसंग । अंगी रंगवोनि रंग ॥
लोकलाजेचा बिछाना । निंदा स्तुतीचा उशाणा ॥
षड्विकार खाट केली । पंच विषयांनी विणली ॥
शांति शालू पांघरूनि । झोपी गेलो मूळस्थानी ॥
तुकड्या म्हणे अंतर्बाह्य । पांडुरंग झाला साह्य ॥